सुवर्णसंधी..! बार्टी (BARTI) मार्फत UPSC परीक्षेच्या निवासी प्रशिक्षणासाठी अर्ज करण्याचे आवाहन
महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जातीतील ७० उमेदवारांना परीक्षेचे येरवडा, पुणे येथे निवासी प्रशिक्षण देण्यात येणार आहे. बार्टीमार्फत संघ लोकसेवा आयोग- नागरी सेवा उमेदवारांची निवड करण्याकरिता राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था (SIAC) मुंबई, यांच्या मार्फत एकत्रित सामाईक प्रवेश परीक्षा आयोजित करण्यात येत असून त्याकरिता ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे.
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी https://www.siac.org.in > Home > Admission All Notice Board या संकेतस्थळावर भेट द्यावी.
ऑनलाईन अर्ज करण्याचा कालावधी
१. ऑनलाईन अर्जाची सुरुवात:- दि.४.११.२०२२
२. अर्ज भरण्याचा अंतिम दिनांक:- दि. २५.११.२०२२
३. प्रवेश परीक्षा:- दि.४.१२.२०२२
प्रशिक्षण कालावधीमध्ये उमेदवारास मिळणारे लाभ (प्रती विद्यार्थी)
१. बार्टी संकुल, येरवडा, पुणे येथे संघ लोकसेवा आयोग – नागरी सेवा परीक्षेचे (पूर्व व मुख्य) निवासी पूर्व
प्रशिक्षण
२. प्रशिक्षण कालावधी – १० ते ११ महीने
३. तज्ञ व अनुभवी प्राध्यापकांचे मार्गदर्शन
४. डिजिटल क्लासरुम
५. अभ्यासासोबतच व्यक्तिमत्व व नेतृत्व विकसनाची तयारी
६. वेळोवेळी प्रशासकीय अधिकाऱ्यांचे व विशेष व्यक्तींचे मार्गदर्शनपर सत्र
७. सुसज्ज अभ्यासिका व ग्रंथालय
८. सर्व सुख-सुविधांयुक्त निवास व्यवस्था
सविस्तर जाहिरात, परीक्षेचा अभ्यासक्रम, पात्रता
ऑनलाईन अर्ज भरण्याविषयीच्या सूचना व इतर माहिती साठी https://www.siac.org.in > Home > Admission All Notice Board या लिंकवर क्लिक करा.
●संपर्क:- ०२०-२६३३३३३०/ २६३४३६००