Take a fresh look at your lifestyle.

महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ बीज भांडवल योजना; जाणून घ्या सविस्तर माहिती

0

बीज भांडवल योजना राबविताना अवलंबविण्याची कार्यपद्धती:- महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळामार्फत विविध योजना राबविल्या जातात. यामध्ये बीज भांडवल योजना राबविण्यात येत असून या योजनेअंतर्गत रु. 50,000 ते जास्तीतजास्त रु. 5,00,000/- पर्यंत राष्ट्रीयीकृत बँकेमार्फत कर्ज मंजूर केले जाते.

यामध्ये बँकेचे कर्ज 75% व महामंडळाचे कर्ज 20% तसेच उर्वरित 5% अर्जदाराचा सहभाग असतो.
महामंडळामार्फत सदर योजना राबविताना पुढीलप्रमाणे आवश्यक कागदपत्रे लाभार्थ्याकडून घेतली जातात व त्यानुसार योग्य प्रस्ताव बँकेला पाठविले जातात. बँकेकडून अशा प्रकरणांत कर्ज मंजूरी प्राप्त झाल्यानंतर महामंडळामार्फत बँकेने एकूण मंजूर केलेल्या कर्ज रक्कमेवर 20% इतक्या रकमेचा (रु. 10,000/- अनुदानासहित) धनादेश संबंधित बँकेला पाठविला जातो व तद्नंतर अर्जदाराला बँकेमार्फत कर्ज वितरीत केले जाते. अशाप्रकारे बीज भांडवल योजनेअंतर्गत कर्ज प्रकरणाची कार्यवाही करण्यात येते.

या योजनेअंतर्गत रु. 5 लाखापर्यंत गुंतवणूक असणारे प्रकल्प विचारात घेतले जातात. महामंडळाकडून 20% बीज भांडवल रक्कम (रू.10,000/- अनुदानासह) उपलब्ध करुन दिली जाते. प्रकल्प रकमेच्या 5% रक्कम स्वत:चा सहभाग म्हणून अर्जदाराने भरावयाची आहे. उर्वरित 75% रक्कम ही बँकेकडून मंजूर केली जाते. महामंडळाकडून मंजूर केलेल्या बीज भांडवल रकमेवर 4% व्याजाचा दर आकारला जातो. वसुलीचा कालावधी पाच वर्षाचा आहे.

कर्ज मंजूरीकरिता आवश्यक कागदपत्रे
1 जातीचा दाखला
2 उत्पन्नाचा दाखला
3 रहिवाशी पुरावा (रेशनकार्ड, मतदार ओळखपत्र, आधारकार्ड, पॅन कार्ड, इलेक्ट्रीक बिल इत्यादी)
4 व्यवसायाच्या अनुषंगाने कागदपत्रे जसे की, मालाचे किंमतीपत्रक, आवश्यक असल्यास व्यवसायाच्या जागेचा पुरावा, गुमास्ता लायसन्स, व्यवसायानुरुप इतर कागदपत्रे वाहनाकरिता लायसन्स, गुमास्ता लायसन्स, परमिट, बॅच नंबर इत्यादी
5 आवश्यकतेप्रमाणे प्रकल्प अहवाल (रु. 2.00 लाखाच्या वर)