शैक्षणिक, रोजगारनिर्मिती व आर्थिक उन्नती साठी समाजातील विविध घटकांसाठीच्या केंद्रीय महामंडळाच्या योजना / राज्य शासनाच्या योजना योजना सविस्तर माहिती
1.योजनेचे नाव:- केंद्रीय महामंडळाच्या योजना (NSFDC) / राज्य शासनाच्या योजना
2.योजनेचा प्रकार:- केंद्रीय महामंडळाच्या योजना(NSFDC)
मुदत कर्ज योजना
लघुऋण वित्त योजना
महिला किसान योजना
शैक्षणीक
राज्य शासनाच्या योजना
विशेष केंद्रीय अर्थसहाय्य योजना
50 % अनुदान
प्रशिक्षण
भाग भांडवल
बीजभांडवल कर्ज योजना
थेट कर्ज योजना
3.योजनेचा उद्देश:- महाराष्ट्रामध्ये मागासवर्गीयांपैकी संख्येने मोठयाप्रमाणात असलेला मातंग समाज व तत्सम 12 पोटजातीं यांचा आर्थिक, शैक्षणिक व सामाजिक विकास होण्याच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या कर्ज योजना राबवून त्यांना दारिद्रय रेषेच्यावर आणणे हा या महामंडळाच्या स्थापनेचा मुख्य उद्देश आहे.
4.योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नाव:- अनुसूचित जाती मातंग समाजातील 12 पोटजातीं पुढील प्रमाणे.मांग, मदारी, मातंग, राधेमांग, मिनी मादींग, मांग गारूडी, मादींग, मांग गारोडी, दानखणी मांग, मादगी, मांग महाशी, मादिगा
5.योजनेच्या प्रमुख अटी:- अर्जदार महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असावा अर्जदाराचे वय 18 वर्ष पूर्ण असावे अर्जदार हा मातंग समाजाच्या 12 पोटजातील असावा.
अर्जदाराने जो व्यवसाय निवडलेला असेल त्या व्यवसायाचे ज्ञान व अनुभव त्याच्याकडे असावा. शहरी व ग्रामिण भागातील अर्जदाराच्या कुटूंबाचे वार्षिक उत्पन्न मर्यादा रू. 100000/- पर्यत असावे. अर्जदाराने या महामंडळाकडुन व इतर कोणत्याही शासकिय उपक्रमाकडून आर्थिक लाभ घेतलेला नसावा. महामंडळाने वेळोवेळी घालुन दिलेल्या अटी व शर्ती अर्जदारावर बधंनकारक राहतील.
6.दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरुप:- वैयक्तीक कर्ज योजना
7.अर्ज करण्याची पध्दत/अर्जाचा नमुना व सोबत जोडावयाची कागदपत्रे:- अर्जदाराचा जातीचा दाखला (सक्षम अधिकारी यांच्याकडुन घेतलेला असावा.)
अर्जदाराच्या कुटूंबाचा उत्पन्नाचा दाखला.(तहसीलदार यांच्याकडुन घेतलेला असावा.) नुकत्याच काढलेल्या पासपोर्ट साईज फोटोच्या 2 प्रति जोडाव्यात.
राष्ट्रीय अनुसूचित जाती,जमाती वित्तीय विकास महामंडळाच्या योजनेचा फायदा घेऊ इच्छिणाऱ्या अर्जदाराच्या बाबत नुकत्याच काढलेल्या पासपोर्ट साईज फोटोच्या 3 प्रती जोडाव्यात. अर्जदाराच्या शैक्षणिक दाखला रेशनकार्डच्या झेरॉक्स प्रती. ज्या ठिकाणी व्यवसाय करावयाचा असेल त्या जागेच्या उपलब्धतेबाबतचा पुरावा. ज्या ठिकाणी व्यवसाय करावयाचा असेल त्या जागेची भाडे पावती, करारपत्र किंवा मालकी हक्काचा पुरवा. एन.एस.एफ.डी.सी. योजनेखाली वाहन खरेदी करण्यासाठी ड्रायव्हींग लायसेन्स व आर.टी.ओ. कडील परवाना इत्यादी.
वाहन खरेदीसाठी वाहनाच्या बुकिंगबद्यल/किंमतीबाबत अधिकृत विक्रेता/कंपनी कडील दरपत्रक. व्यवसायासंबबधी तांत्रिक प्रमाणपत्र तसेच अनुभवाचा दाखला. व्यवसायासंबंधी प्रकल्प अहवाल/खरेदी करावयाच्या मालाचे, साहित्याचे कोटेशन.
प्रतिज्ञा पत्र (स्टॅम्प पेपरवर)
8.योजनेची वर्गवारी:- शैक्षणिक / रोजगारनिर्मिती / आर्थिक उन्नती / विशेष सहाय्य
9.संपर्क कार्यालयाचे नाव:- महामंडळाचे जिल्हा कार्यालय