Take a fresh look at your lifestyle.

इयत्ता 5 वी ते 7 वी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थींनींना सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना; जाणून घ्या सविस्तर माहिती

0

योजना सविस्तर माहिती
1.योजनेचे नाव:- इयत्ता 5 वी ते 7 वी मध्ये शिकणाऱ्या विजाभज / विमाप्र प्रवर्गाच्या विद्यार्थींनींना सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना.

2.योजनेचा प्रकार:- राज्यस्तरीय योजना

3.योजनेचा उद्देश:- शासन निर्णय दिनांक 12 जानेवारी, 1996 अन्वये विजाभज विद्यार्थीनीं करिता व शासन निर्णय दिनांक 29 ऑक्टोबर, 1996 पासून विमाप्र प्रवर्गाच्या विद्यार्थींनींना सुध्दा लागू करण्यांत आली आहे. सदरहू प्रवर्गाच्या विद्यार्थींनींचे गळतीचे प्रमाण कमी करण्यांसाठी प्रोत्साहनपर अनुदान म्हणून ही शिष्यवृत्ती दिली जाते.

4.योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नाव:- विमुक्त जाती व भटक्या जमाती/ विशेष मागास प्रवर्ग.

5.योजनेच्या प्रमुख अटी:- विद्यार्थीनी विजाभज / विमाप्र या प्रवर्गातील असावी. विद्यार्थीनी इ. 5 वी ते 7 वी मध्ये शिकणारी असावी. विद्यार्थीनी ही शासन मान्य शाळेत नियमित शिकणारी असावी.

6.दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरुप:- प्रति विद्यार्थीनीस दरमाह रुपये 60/- याप्रमाणे 10 महिन्या करीता रु.600/- शिष्यवृत्तीची रक्कम संबंधीत लाभार्थ्यांस अदा केली जाते.

7.अर्ज करण्याची पध्दत:- सदर योजनेचे संगणकीकरण झालेले असून ऑनलाईन फॉर्म भरण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांनी https://mahaeschol.maharashtra.gov.in या वेबसाईटवर या योजनेंतर्गत पात्र विद्यार्थिनींचे अर्ज / माहिती भरुन संबंधित जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद यांचेकडे सादर करावी.

8.योजनेची वर्गवारी:- शैक्षणिक

9.संपर्क कार्यालयाचे नांव:- संबंधित जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद. संबंधित शाळांचे मुख्याध्यापक.