Take a fresh look at your lifestyle.

नोकरदार वर्गासाठी महत्वाचे! …अन्यथा तुमचे पीएफ(PF) खातं होईल बंद

0

नोकरदार वर्गासाठी महत्वाची बातमी आहे.. नोकरदाराच्या दर महिन्याच्या पगारातून ठराविक रक्कम ‘पीएफ’ अर्थात भविष्य निर्वाह निधीच्या रुपाने कापली जाते.. कर्मचारी भविष्य निधी संघटन (EPFO) या संस्थेत ही रक्कम ठेवली जाते. ‘पीएफ’ स्वरुपात जमा होणाऱ्या या रकमेवर या संस्थेकडून नोकरदारांना व्याजही मिळते.

‘पीएफ’ खात्यात जमा होणाऱ्या या पैशांमुळे कर्मचाऱ्यांचे निवृत्तीनंतरचे आयुष्य आर्थिकदृष्ट्या सुरक्षित होते. वृद्धापकाळातील अडीअडचणीच्या वेळी कर्मचाऱ्यांना हे पैसे वापरता येतात. मात्र, ‘पीएफ’ खात्याबाबतही काही नियम असून, बऱ्याच कर्मचाऱ्यांना त्याची काहीच माहिती नसते.

खासगी क्षेत्रातील कर्मचारी सतत वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये काम करतात. वेगवेगळ्या संस्थांमध्ये काम करताना, वेगवेगळी ‘पीएफ’ खाती केली जातात. त्यामुळे तुमचे जुने ‘पीएफ’ खाते निष्क्रिय होते. मात्र, तसं करण्याची गरज नाही. नवीन कंपनीत रुजू झाल्यानंतरही कर्मचाऱ्याला जुना ‘पीएफ’ क्रमांक द्यावा लागतो. नव्याने पीएफ खाते सुरु करण्याची गरज नाही.

तुमचंही ‘पीएफ’ खातं असेल, तर ‘ईपीएफओ’बाबत नियमांची माहिती असणं आवश्यक आहे, अन्यथा तुमचं ‘ईपीएफओ’ खातं कधी बंद होईल, तेही सांगता येत नाही.

पीएफ’ खाते कधी बंद होते?

जर तुमच्या ‘पीएफ’ खात्यात 36 महिन्यांपर्यंत कोणताही व्यवहार झाला नसेल, तर अशा परिस्थितीत तुमचं ‘पीएफ’ खातं बंद होऊ शकते.

खातेदार कायमस्वरूपी परदेशात स्थायिक झाला, तरी त्याचे ‘पीएफ’ खाते निष्क्रिय केले जाऊ शकते.

‘पीएफ’ खातेधारकाचा दुर्दैवाने मृत्यू झाल्यास, त्याचे ‘पीएफ’ खाते निष्क्रिय केले जाते.

‘पीएफ’ खातेधारकाने त्याच्या भविष्य निर्वाह निधीतून सर्व सेवानिवृत्ती निधी काढल्यास त्याचे खातेही निष्क्रिय होते. दरम्यान, ‘पीएफ’ खाते निष्क्रिय झाल्यानंतरही तुम्हाला ते पुन्हा सक्रिय करता येते..’पीएफ’ खाते पुन्हा सक्रिय करण्यासाठी ‘ईपीएफओ’मध्ये अर्ज सादर करावा लागतो.. त्यानंतर तुमचे निष्क्रिय ‘पीएफ’ खाते पुन्हा सुरु केले जाते. निष्क्रिय ‘पीएफ’ खात्यातील रकमेवरही व्याज मिळते.

अनेक कर्मचारी भविष्य निर्वाह निधीतून सेवानिवृत्तीचे नियोजन करीत असतात. अशा वेळी ‘पीएफ’बाबतच्या नियमांची माहिती असणं आवश्यक असतं. हे नियम माहित नसल्यास, कर्मचाऱ्यांचं नुकसान होऊ शकते. त्यामुळे याबाबत काळजी घेणं महत्वाचं…