शेतकरी बांधवांना दिलासा! पुर्नरचित हवामान आधारित पीक विमा योजनेतंर्गत मिळणार नुकसान भरपाई
जळगाव (जिमाका वृत्तसेवा)- पुनर्रचित हवामान आधारित पीक विमा योजना 2022-23 अंतर्गत जळगाव जिल्हयातील केळी या फळपिकासाठी जास्त तापमान या हवामान धोक्यांतर्गत नुकसान भरपाई रक्कमेस पात्र ठरणार आहे.यामध्ये 1 ते 30 एप्रिल या कालावधीत सलग 5 दिवस 42 डिग्री सेल्सीयस किंवा त्यापेक्षा जास्त तापमानामुळे 83 महसुल मंडळ पात्र ठरली आहे. अशा महसुल मंडळांना रु 35000/- प्रति हेक्टर या प्रमाणे नुकसान भरपाई रक्कम मिळेल.
दिनांक 1 ते 31 मे, या कालावधीत सलग 5 दिवस 45 डिग्री सेल्सीयस किंवा त्यापेक्षा जास्त तापमानामुळे 61 महसुल मंडळ पात्र ठरली आहे. अशा महसुल मंडळांना रु. 43,500/- प्रति हेक्टर या प्रमाणे नुकसान भरपाई रक्कम मिळेल.
माहे एप्रिल व मे या दोन्ही महीन्यात जास्त तापमान या हवामान धोक्यांतर्गत पात्र ठरलेल्या महसुल मंडळांना जास्तीत जास्त 43,500/- प्रति हेक्टर या प्रमाणे नुकसान भरपाई रक्कम मिळेल. पालकमंत्री जळगाव यांनी भारतीय कृषि विमा कंपनीस विमा कालावधी संपताच पात्र शेतकऱ्यांचे खात्यावर नुकसान भरपाईची रक्कम तात्काळ वर्ग करण्याचे निर्देश दिले आहे.