Take a fresh look at your lifestyle.

भारतीय संविधानाचा जागर! 7 एप्रिल 2022 ते 14 एप्रिल 2022 या आठवडाभरात संविधानाची वेगवेगळी अंगे जाणून घेण्याचे आवाहन

0

क्रांतिबा क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले जयंती आणि महामानव, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्ताने या वर्षापासून वैचारिक जयंती साजरी करण्याचा निश्चय आम्ही आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने करीत आहोत.

महापुरुषांच्या जीवन चरित्राचा वैचारिक जागर करण्याबरोबरच भारतीय संविधानाचा जागर करण्याचा निर्णय आम्ही या जयंतीच्या निमित्ताने घेत आहोत आणि त्याच बरोबर सुरुवात सुद्धा करीत आहोत.

भारतीय संविधान लोकांपर्यंत पोहोचणे अत्यंत गरजेचे आहे असे आम्ही मानतो. संविधाना बाबत जागरूकता होणं हे सामाजिक परिवर्तनाचा सगळ्यात मोठा भाग आहे यावर आमचा विश्वास आहे. त्यासाठी समाज संविधान साक्षर होणे हे अत्यंत गरजेचे आहे.संविधाना बाबत लोकांच्या मनामध्ये अनेक समज गैरसमज आहे. गैरसमज दूर करण्याच्या उद्देशाने आणि संविधानाबद्दल च्या जाणिवा आणि नेणिवा वृद्धींगत करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम आम्ही हाती घेत आहोत.

भारतीय संविधान सोप्या पद्धतीने समजून घेण्यासाठी आपण सर्व या वैचारिक जयंतीचा भाग म्हणून या प्रक्रियेत सहभाग घेऊया, असं आम्ही आपणास विनंतीपूर्वक आवाहन करतो.

दिनांक 7 एप्रिल 2022 ते 14 एप्रिल 2022 या आठवडाभरात आपण संविधानाची वेगवेगळी अंगे समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

या आठ सत्रांमध्ये

१) भारतीय संविधान निर्मितीची प्रक्रिया आणि पार्श्वभूमी

२) भारतीय संविधानाची प्रास्ताविका आणि आपली भूमिका

३) भारतीय संविधानातील भारतीय नागरिकांसाठी चे मूलभूत अधिकार त्यांचे महत्त्व

४) भारतीय संविधानातील राज्य धोरणाची नीति निर्देशक तत्वे आणि राज्यकर्त्यांची भूमिका

५) संसद/ न्यायालय/ कार्यकारी मंडळ यांची भूमिका.

६) भारतीय संविधानातील आरक्षण, त्याबाबतचे समज-गैरसमज.

७) एक रूप नागरी सहिता (ज्याला आपण समान नागरिक कायदा म्हणतो)

८) आपल्या दैनंदिन आयुष्यातील संविधान.

या बाबी आपण समजून घेणार आहोत.

आपल्याला या प्रक्रीयेत सहभागी व्हायचे असेल तर आम्ही आपले स्वागत करत आहोत. ही प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने होत असल्या कारणामुळे, ज्या लोकांना खरोखर हे सगळे समजून घ्यायचं आहे आणि ज्यांना यासाठी वेळ द्यायचा आहे, ते सगळे लोक मग ते विद्यार्थी, प्राध्यापक, ज्येष्ठ नागरिक, सामाजिक कार्यकर्ते, महिलावर्ग, सगळे लोकं सहभागी होऊ शकतात.

पूर्व नाव नोंदणी आवश्यक आहे

नाव नोंदणीसाठी संपर्क

१) वैशाली गौतम निकम 9421512533

२) गौतम तुकाराम वाघ- 9604107766

प्रवेश शुल्क – 200 रुपये मात्र (प्रवेश मर्यादित)