Take a fresh look at your lifestyle.

जाहीर आवाहन – ग्रामपंचायत कर भरणा बाबत महत्त्वाची सूचना

0

🔹 सर्व ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच व सदस्य यांच्यासाठी महत्त्वाची माहिती!

जिल्हाधिकारी जळगाव यांचे न्यायालयात महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 चे कलम 14 (ह) अंतर्गत विवाद अर्ज प्राप्त होत असतात. जर पावती मिळाल्यापासून तीन महिन्यांच्या आत कर भरला नाही, तर संबंधित व्यक्ती ग्रामपंचायत सदस्य, सरपंच व उपसरपंच पदावरून अपात्र ठरू शकते. त्यामुळे सर्व संबंधित व्यक्तींनी खालील बाबींची तातडीने अंमलबजावणी करावी.

✅ ग्रामपंचायतीस किंवा जिल्हा परिषदेस कोणताही कर किंवा फी थकित असेल, तर तो दिनांक 31/03/2025 पर्यंत भरणा करावा.

✅ कराची पावती मिळाली नसल्यास, आपल्या ग्रामसेवक अथवा ग्रामपंचायतीशी संपर्क साधून थकबाकीची पावती प्राप्त करावी व मुदतीत भरणा करावा.

✅ कर भरण्याच्या अंतिम मुदतीबाबत माहिती आपल्या स्थानिक ग्रामपंचायतीकडून त्वरित घ्यावी.

⚠ महत्त्वाचे:

जर आपण विहीत मुदतीत कर भरला नाही, तर कलम 14 (ह) अंतर्गत अपात्रतेस सामोरे जावे लागू शकते.

जबाबदार नागरिक आणि लोकप्रतिनिधी म्हणून आपल्या जबाबदाऱ्या पार पाडूया!