मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेंतर्गत प्रशिक्षण घेत असलेल्या प्रशिक्षणार्थी यांची अधार नोंद CMYKPY पोर्टलवर करुन घेणे आवश्यक
राज्यातील युवक युवतींना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देवून त्यांची नोकरी मिळण्याची क्षमता वाढविण्यासाठी सुरु करण्यात आलेल्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेंतर्गत कार्यप्रशिक्षणाचा कालावधी ११ महिने करण्यास संदर्भ क्र. ०३ अन्वये मान्यता देण्यात आलेली आहे. सदर योजनेंतर्गत प्रशिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांना सबंधित आस्थापनेत पुन्हा रुजु झाल्याच्या दिनांकपासून ०५ महिन्याच्या कालावधीसाठी कार्यप्रशिक्षण अनुज्ञेय राहील.
या योजनेंतर्गत संबधित आस्थापनांनी कार्य प्रशिक्षणासाठी यापुर्वी रुजु झालेल्या व यापुढे नव्याने रुजु होणाऱ्या प्रशिक्षणार्थींची आधार नोंद CMYKPY पोर्टलवर करणे आवश्यक आहे. सदर आधार नोंद करण्याची सुवधिा प्रशिक्षणार्थींना त्यांच्या INTERN LOGIN मध्ये उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. सदर आधार नोंद दिनांक ११ एप्रिल, २०२५ पर्यंत करुन घेणे आवश्यक आहे. याची सर्व संबंधित आस्थापनांनी त्यांच्या आस्थापनामधील प्रशिक्षणार्थीची आधार नोंद दिनांक ११ एप्रिल, २०२५ पर्यंत होईल यांची दक्षता घ्यावी तसेच, प्रशिणार्थीचे दिनांक ११ एप्रिल, २०२५ पूर्वी आधार नोंद न केल्यास विद्यावेतन अदा होणार नाही यांची नोंद आस्थापनेने घ्यावी, असे आवाहन सहाय्यक आयुक्त कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता संदीप गायकवाड यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.