Take a fresh look at your lifestyle.

संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेंतर्गत लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांना आधार सीडिंग करणे अनिवार्य

0

संजय निराधार अनुदान योजना आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेंतर्गत लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांना आधार सीडिंग करणे अनिवार्य करण्यात आले आहे. त्यामुळे ज्यांचे सिडींग झाले नसतील त्यांनी करून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. योजनेचा लाभ थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होण्यासाठी ‘आधार सीडिंग’ आवश्यक आहे.

त्यामुळे ज्या लाभार्थ्यांनी अद्याप आपले आधार कार्ड बँक खात्याशी लिंक केलेले नाही, त्यांनी तातडीने ही प्रक्रिया पूर्ण करावी. ‘आधार सीडिंग’ न केल्यास लाभार्थ्यांना योजनेचा लाभ मिळण्यास अडचण येऊ शकते तसेच भविष्यात योजनेतून वगळण्यात येऊ शकते.