Take a fresh look at your lifestyle.

विविध क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्यांसाठी प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना

0

केंद्र सरकारच्या प्रधान मंत्री विश्वकर्मा योजनेला 17 सप्टेंबर 2023 रोजी सुरुवात झाली. पारंपरिक कारागिरांना पाठबळ देण्याच्या उद्देशाने पीएम विश्वकर्मा योजना सुरू करण्यात आली आहे.

देशातील विविध पारंपरिक 18 क्षेत्रांमध्ये कार्यरत कारागिरांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. या क्षेत्रांमध्ये सुतारकाम, नौकाबांधणी, चिलखतकार, लोहार, हातोडी व हत्यारे बनवणारे, चाव्या बनवणारे, सोनार, कुंभार, शिल्पकार, चांभार, गवंडी, बुरुडकाम, पारंपरिक खेळणी बनवणारे, न्हावी, पुष्पहार बनवणारे, धोबी, शिंपी, मासेमारीसाठी लागणारे जाळे विणणारे यांचा समावेश आहे.

ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक 👇

https://pmvishwakarma.gov.in/Login

अधिक माहितीसाठी किंवा कोणत्याही प्रकारची अडचण सोडवण्यासाठी कारागीर आणि हस्तकलाकार 18002677777 या क्रमांकावर संपर्क साधू शकतात किंवा pm-vishwakarma@dcmsme.gov.in वर ईमेल करू शकतात.