Take a fresh look at your lifestyle.

वेळेत लाइट आली नाही, तर भरपाईसाठी असा करा अर्ज

0

ग्राहकांना निर्धारित वेळेत विजेची सेवा दिली पाहिजे असे बंधनकारक आहे. जर निर्धारित वेळेत सुविधा दिली गेली नाही तर वीज वितरण कंपनी कडून ग्राहकाला भरपाई मिळू शकते. लघु आणि उच्चदाब ग्राहकांना प्रति तास प्रमाणे भरपाई मागण्याचा अधिकार आहे. वेळेत वीज आली नाही, फ्यूज दुरुस्ती, जळालेले मीटर, भूमिगत लाईन याबाबत शहरी आणि ग्रामीण भागासाठी भरपाईची तरतूद आहे.

वीज वितरण कंपनी कडून ग्राहकांना भरपाई:- विलंबाने सेवा दिली तर राज्य विद्युत वीज नियामक आयोगाने वीज वितरण कंपनी कडून भरपाई देण्याची तरतूद केली आहे. लघुदाब ग्राहकांना प्रति तास ५० रूपये किवा जास्तीत जास्त ५०० रूपये आणि उच्चदाब ग्राहकांना प्रति तास १०० रूपये आणि जास्तीत जास्त १ हजार रूपयांची भरपाईची तरतूद केली आहे.

राष्ट्रीय टोल-फ्री : १९१२ / १९१२०

महावितरण टोल-फ्री : १८००-१०२-३४३५ / १८००-२३३-३४३५

ई-मेल: customercare@mahadiscom.in