केंद्र सरकारचा पशु औषधांबाबत मोठा निर्णय! शेतकऱ्यांचा होणार फायदा…
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने पशुधन आरोग्य व रोग नियंत्रण कार्यक्रमात सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे.
या योजनेच्या माध्यमातून देशातील पशुधनाचे आरोग्य सुधारण्यावर भर दिला जाणार आहे. ही योजना जनावरांच्या आरोग्यात सुधारणा घडवून उत्पादनक्षमता वाढवेल आणि ग्रामीण भागात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देईल.
केंद्र सरकारची ही योजना 2024-25 आणि 2025-26 या दोन वर्षांसाठी राबविण्यात येणार आहे. यासाठी तब्बल 3880 कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला असून, यातील 75 कोटी रुपये पशुवैद्यकीय औषधांच्या विक्रीसाठी अनुदान स्वरूपात दिले जाणार आहेत.
कारण शेतकऱ्यांना परवडणाऱ्या दरात औषधे उपलब्ध होतील. या योजनेच्या माध्यमातून लसीकरण, देखरेख आणि आधुनिक आरोग्य सेवांद्वारे रोग नियंत्रण करणे शक्य होणार आहे.