Take a fresh look at your lifestyle.

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात प्रकल्पग्रस्तांसाठी भरती जाहीर

0

कृषि विद्यापीठातील गट-क संवर्गातील एकुण रिक्त पदांपैकी ५० टक्के रिक्त पदे त्याच कृषि विद्यापीठाचे बाधित प्रकल्पग्रस्तांमधुन भरण्याकरीता विशेष भरती प्रक्रिया राबविण्यास एक विशेष बाब म्हणुन परवानगी देण्यात आली आहे. त्याअनुषंगाने डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला करिता ज्या प्रकल्पग्रस्तांच्या प्रत्यक्षात जमिनी संपादित केलेल्या आहेत, अशा प्रकल्पबाधित कुटूंबामधुन प्रकल्पग्रस्तांचा सरळसेवेचा अनुशेष भरून काढण्याकरीता विशेष भरती मोहिमे अंतर्गत वरिष्ठ लिपीक, शाखा सहायक-नि-टंकलेखक, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), ग्रंथालय सहायक, वरिष्ठ यांत्रिक, कनिष्ठ यांत्रिक, पंप परिचर व वाहन चालक या संवर्गाची एकुण ८० रिक्त पदे सरळसेवेने भरण्याकरीता पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत असून त्याबाबतची सविस्तर जाहिरात www.pdkv.ac.in या विद्यापीठ संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात येत असुन, ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक दि. १० मार्च २०२५ पासून उपलब्ध करण्यात येत आहे, याची सर्व संबंधितांना नोंद घ्यावी.

कृषि विद्यापीठातील गट-क संवर्गातील एकुण रिक्त पदांपैकी ५० टक्के रिक्त पदे त्याच कृषि विद्यापीठाचे बाधित प्रकल्पग्रस्तांमधुन भरण्याकरीता विशेष भरती प्रक्रिया राबविण्यास एक विशेष बाब म्हणुन परवानगी देण्यात आली आहे. त्याअनुषंगाने डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला करिता ज्या प्रकल्पग्रस्तांच्या प्रत्यक्षात जमिनी संपादित केलेल्या आहेत, अशा प्रकल्पबाधित कुटूंबामधुन प्रकल्पग्रस्तांचा सरळसेवेचा अनुशेष भरून काढण्याकरीता विशेष भरती मोहिमे अंतर्गत गट क च्या कनिष्ठ संशोधन सहायक, कृषि सहायक (पदवीधर), कृषि सहायक (पदविका) एकुण ७१ रिक्त पदांकरीता सरळसेवेने खालील तक्त्यामधील पदे भरण्याकरीता पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत असून त्याबाबतची सविस्तर जाहिरात www.pdkv.ac.in या विद्यापीठ संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात येत असुन, ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक दि. १० मार्च, २०२५ पासून उपलब्ध करण्यात येत आहे, याची सर्व संबंधितांना नोंद घ्यावी.