SEBC, OBC विद्यार्थ्यांना शेवटची संधी, जात प्रमाणपत्राबाबत CET Cell चा मोठा निर्णय…
▪️ CET Cell ने ओबीसी आणि एसईबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा दिला असून जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून आता 6 एप्रिल 2025 पर्यंत जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्याची मुभा देण्यात आली आहे.
▪️ सीईटी कक्षामार्फत 2024-25 या शैक्षणिक वर्षात राबविलेल्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेत एसईबीसी आणि ओबीसी प्रवर्गातून विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांना विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. प्रवेश घेताना अनेक विद्यार्थ्यांनी जात वैधता प्रमाणपत्रासाठी सादर केलेल्या अर्जाची पावती सादर केली होती. या विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी सहा महिन्यांची मुदत देण्यात आली होती.
▪️ अद्याप जात वैधता प्रमाणपत्र मिळालेले नाही अशा विद्यार्थ्यांनी संबंधित जात पडताळणी कार्यालयाशी संपर्क साधावा आणि दिलेल्या मुदतीमध्ये जात वैधता प्रमाणपत्र प्राप्त करून ते ऑनलाइन सीईटी कक्षाच्या संकेतस्थळावर अपलोड करावे. 2024-25 या शैक्षणिक वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठीच ही सवलत आहे. 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी एसईबीसी आणि ओबीसी संवर्गातून अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांना ही सवलत मिळणार नाही.