शिर्डी साईबाबा संस्थानचा मोठा निर्णय…
शिर्डी साईबाबा संस्थानने एक मोठा निर्णय घेतला आहे. कारण आता मोफत जेवणासाठी भाविकांना कूपन दिले जाणार आहेत.
कारण शिर्डीमध्ये अलीकडे घडलेल्या काही गुन्हेगारीच्या घटनांमुळे संस्थानने हा निर्णय घेतला आहे. तसेच, खासदार सुजय विखे यांनी मोफत जेवणाचा गैरवापर होत असून, त्यामुळे गुन्हेगारी वाढत असल्याचा मुद्दा उपस्थित केला होता.
तसेच भाविकांना साईबाबांच्या दर्शनानंतर रांगेतील उदी काउंटरवर हे कूपन दिले जाणार आहेत. हे कूपन घेऊन भाविक प्रसादालयात जेवण करू शकतील.
तसेच हा नवा नियम आजपासून लागू होणार आहे. आता या निर्णयामुळे शिर्डीतील वाढती गुन्हेगारी आटोक्यात येईल, अशी अपेक्षा संस्थानने व्यक्त केली आहे.