नीट-यूजी परीक्षा ४ मे २०२५ रोजी आयोजित
नीट-यूजी परीक्षा ४ मे रोजी – वैद्याकीय प्रवेश परीक्षा ‘नीट-यूजी’ ४ मे रोजी आयोजित करण्यात येणार असल्याची घोषणा राष्ट्रीय परीक्षा कक्षाने (एनटीए) शुक्रवारी केली. या परीक्षेसाठी अर्जाची प्रक्रिया शुक्रवारपासूनच सुरू करण्यात आली असून त्याची मुदत ७ मार्चपर्यंत आहे. परीक्षेला बसलेल्या उमेदवारांच्या संख्येनुसार ही देशातील सर्वात मोठी प्रवेश परीक्षा आहे. २०२४मध्ये विक्रमी २४ लाखांहून अधिक उमेदवारांनी ही परीक्षा दिली. वैद्याकीय महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेण्यासाठी दरवर्षी ‘एनटीए’कडून या परीक्षेचे आयोजन करण्यात येते. एमबीबीएससाठी १ लाख ८ हजार जागा उपलब्ध आहेत.