घरेलू कामगारांना कल्याणकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी लागणारी कागदपत्रे
मंडळातर्फे राज्यातील घरेलू कामगारांची नोंदणी करण्यात येवून त्यांच्यासाठी कल्याणकारी योजना राबविण्यात येतात. महाराष्ट्र घरेलु कामगार मंडळ अधिनियम, २००८ कलम 10 अन्वये घरेलू कामगारांसाठी कल्याणकारी योजनांची तरतूद केलेली आहे.अपघात घडल्यास लाभार्थींना तात्काळ सहाय्य पुरविणे, लाभार्थीच्या मुलांच्या २ शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य देणे, लाभार्थींच्या अथवा त्यांच्यावर अवलंबून असलेल्या व्यक्तीच्या आजारावर उपचार करण्यासाठी वैदयकीय खर्चाची तरतूद करणे, महिला लाभार्थींकरीता प्रसुती लाभाची तरतूद करणे, लाभार्थीचा मृत्यू झाल्यावर कायदेशीर वारसाला अंत्यविधीच्या खर्चासाठी रक्कम प्रदान करणे.
लागणारी कागदपत्रे
• सुधारित मासिक नोंदणी फी (रुपये 30/- वरुन रुपये 1/- व अंशदान रुपये ५/- वरुन रुपये १/-) इतके शुल्क चलन मागणी अधिकर्ष/ पोस्टल ऑर्डर / रोखीने भरण्यात यावे.
• घरेलू कामगाराचा वयाचा दाखला.
• सध्याच्या मालकाचे प्रमाणपत्र किंवा तो घरेलू कामगार आहे हे नमूद करणारे लाभार्थीचे प्रतिज्ञापत्र
• रहिवाशी दाखला.
• घरेलू कामगाराच्या पासपोर्ट आकाराच्या छायाचित्राच्या तीन प्रती