Take a fresh look at your lifestyle.

जळगांव जिल्ह्यातील वाळू धोरणावर 3 फेब्रुवारी रोजी अल्प बचत भवन मध्ये खुली चर्चा; नागरिकांना येणार सहभागी

0

जिल्ह्यातील वाळू उपसा आणि त्यासंदर्भातील धोरणांवर चर्चा करण्यासाठी 3 फेब्रुवारी रोजी दुपारी 3.30 वाजता अल्प बचत भवन, जळगाव येथे खुली चर्चा आयोजित करण्यात आली आहे. या चर्चेत नागरिक, पर्यावरणप्रेमी, वाळू उपसा व्यावसायिक, स्थानिक प्रशासनाचे प्रतिनिधी आणि अन्य संबंधित घटक सहभागी होऊ शकतील, अशी माहिती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली.

वाळू उपसा आणि पर्यावरण संवर्धन यांचा समतोल राखण्याच्या दृष्टीने ही चर्चा महत्त्वाची ठरणार आहे. शासनाच्या वाळू धोरणात सुधारणा, नियमावलीतील अंमलबजावणी, स्थानिक समस्यांवर तोडगा आणि पर्यावरणपूरक उपाययोजनांवर या चर्चेत भर दिला जाणार आहे.

या चर्चेत सर्वसामान्य नागरिकांना आपले मत मांडण्याची संधी मिळणार असून, प्रशासनाकडूनही धोरणात्मक भूमिका स्पष्ट केली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर सर्व नागरिक, वाळू उपसा व्यावसायिक आणि संबंधित हितधारकांनी चर्चेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे.