Take a fresh look at your lifestyle.

परिचारिका संवर्गातील सीईटी सेल अर्ज नोंदणी प्रक्रिया सुरू

0

विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांची अर्जनोंदणी प्रक्रिया सुरू झाल्यानंतर आता परिचारिका संवर्गातील प्रवेशासाठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून (सीईटी सेल) अर्जनोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे. बीएस्सी नर्सिंग, सामान्य परिचर्या व प्रसाविका (जीएनएम), सार्वजनिक आरोग्य परिचारिका (पीएचएन), मनोरुग्णतज्ज्ञ परिचारिका (डीपीएन) या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना २८ फेब्रुवारीपर्यंत अर्जनोंदणी करता येणार आहे. अर्ज नोंदणीसाठी विद्यार्थ्यांना एक महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे. राज्य सरकारच्या सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत चालवण्यात येणाऱ्या परिचारिका संवर्गातील अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया ‘सीईटी सेल’कडून राबवण्यात येते. विद्यार्थ्यांना आता २८ फेब्रुवारी रोजी रात्री ११ वाजून ५९ वाजेपर्यंत ऑनलाइन अर्जनोंदणी करून शुल्क भरता येणार आहे.