दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी…
दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी आणखी एक महत्वाची अपडेट आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाकडून दहावीच्या परीक्षेचे हॉल तिकीट प्रसिद्ध करण्यात आले आहे.
शाळांना mahahsscboard.in या अधिकृत वेबसाइटवर लॉगिन करून क्रेडेन्शियल्स सबमिट करून विद्यार्थ्यांच्या वतीने प्रवेशपत्र डाउनलोड करता येणार आहे.
दहावीच्या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांना हॉलतिकीट शाळा अधिकाऱ्यांकडून घ्यावे लागणार आहेत. तर अधिकृत वेळापत्रकानुसार, महाराष्ट्र बोर्डाची दहावीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 17 मार्च 2025 दरम्यान घेतली जाणार आहे.
उमेदवारांनी परीक्षा केंद्रावर हॉल तिकीट घेऊन जाणे आवश्यक आहे. कारण त्याशिवाय त्यांना प्रवेश दिला जाणार नाही. तसेच यावेळी दहावीची परीक्षा 2 शिफ्टमध्ये होणार आहेत.
सकाळच्या शिफ्टची परीक्षा सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेपर्यंत तर दुपारच्या शिफ्टची परीक्षा दुपारी 3 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत होणार आहे.