नागरिकांनो, प्रभारी जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे यांनी ‘या’ दिवशी सुट्ट्या केल्या जाहीर; अधिकृत पत्राद्वारे दिली माहिती
प्रभारी जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे यांनी २०२५ साठी त्यांच्या अधिकारातील जळगाव जिल्ह्यासाठी तीन सुट्या जाहीर केल्या आहेत. बँकिंग व न्यायालयीन विभाग वगळता सर्व शासकीय कार्यालयासाठी या सुट्या मंजूर असतील.
प्रभारी जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे यांनी २२ ऑगस्ट २०२५ रोजी शुक्रवारी पोळा सणासाठी, २२ सप्टेंबर २०२५ सोमवारी घटस्थापना आणि २० ऑक्टोबर २०२५ सोमवार रोजी नरक चतुर्दशी निमित्त सुट्या जाहीर केल्या आहेत. यामुळे शासकीय कर्मचाऱ्यांना आता सुट्ट्यांचे नियोजन करण्यासाठी सोपे जाणार आहे.