वाहन चालक प्रशिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी सुवर्णसंधी; सारथी मार्फत वाहन चालक कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम”
सारथी संस्थेमार्फत “सरदार सूर्याजी काकडे सारथी वाहन चालक कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम” अंतर्गत मराठा, कुणबी, कुणबी-मराठा व मराठा-कुणबी या सारथीच्या लक्षित गटाच्या २० ते ४५ या वयोगटातील १,५०० उमेदवारांना ३० दिवसांचे निःशुल्क लाईट मोटर व्हेईकल (LMV) व हेवी ट्रान्सपोर्ट व्हेईकल (HMV) कौशल्य विकास प्रशिक्षणकरिता लक्षित गटातील पात्र व इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. प्रशिक्षणार्थी उमेदवारांना रु.१०,०००/- विद्यावेतन देण्यात येणार आहे. (पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रामधील रहिवासी वगळून) सदर प्रशिक्षण कार्यक्रम संधी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय यांच्या रस्ता सुरक्षा उपक्रमांतर्गत असलेल्या आय. डी. टी. आर. पुणे या केंद्र शासनाच्या संस्थेमार्फत राबविण्यात येत आहे. सदर प्रशिक्षण कार्यक्रमास ऑनलाईन अर्ज करण्यासाठी दिनांक १० जानेवारी २०२५ पासून सारथी संस्थेच्या संकेतस्थळावर http://sarthi-maharashtragov.in. Notice Board> Skill Development नोंदणी करावी.
सरदार सूर्याजी काकडे सारथी वाहन चालक कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम विकास प्रशिक्षण कार्यक्रमाविषयी भविष्यात कोणतीही माहिती/सूचना उपरोक्त लिंकवरच दिली जाईल. वृत्तपत्रात जाहिरात दिली जाणार नाही. उमेदवारांनी सारथीच्या उपरोक्त संकेतस्थळावर सूचनाफलक पाहावे.