या वेबसाईटवरून चेक करा लाडकी बहीण योजनेच्या अर्जाचे स्टेटस…
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अर्जाचे स्टेटस ऑनलाईन चेक करण्यासाठी सर्वप्रथम खालील लिंक वर क्लिक करून किंवा गुगल प्ले-स्टोअरवरून ‘नारीशक्ती दूत – Narishakti Doot’ असे सर्च करून हे ॲप डाऊनलोड करा किंवा ॲप अगोदरच मोबाईल मध्ये असेल तर ते अपडेट करा.
https://play.google.com/store/apps/Narishakti-Doot
‘नारीशक्ती दूत इन्स्टॉल झाल्यावर ओपन करा; त्यानंतर ज्या महिलेचा अर्जाचे स्टेटस चेक करायचे आहे, त्या महिलेचा मोबाईल क्रमांक टाकून लॉगीन करा. पुढे ज्या मोबाईल क्रमांकाने तुम्ही लॉगीन केलं, त्या मोबाईल क्रमांकावर तुम्हाला OTP येईल. तो OTP दिलेल्या बॉक्समध्ये टाकून ‘Verify
OTP’ या पर्यायावर क्लिक करा. लॉगिन केल्यानंतर खालील यापूर्वी केलेले अर्ज या पर्यायावर क्लिक करून तुम्ही तुमच्या अर्जाची सद्यस्थिती जाणून घेऊ शकता, त्यासाठी केलेल्या अर्जावर क्लिक करा.