Take a fresh look at your lifestyle.

लाडक्या बहिणींनो तुम्हाला हक्काच्या पैशांसोबतच मिळणार हक्काचं घर….

0

केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला एक मोठं गिफ्ट मिळालं आहे. प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत एकाच वर्षात महाराष्ट्रासाठी तब्बल वीस लाख घरांना मंजुरी मिळाली आहे.

यासंदर्भात केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज चव्हाण यांनी घोषणा केल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

त्यामुळे आता प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत राज्यात वीस लाख घरे बांधली जाणार आहेत. परंतु या योजेनचा लाभ हा जे बेघर आहेत, त्या सर्वांना मिळणार आहे.

विशेषतः लाडका शेतकरी आणि लाडक्या बहिणींना या घराचा लाभ मिळून देण्याचा प्रयत्न असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

त्यामुळे आता लाडक्या बहिणींना हक्काच्या पैशांसोबतच हक्काचं घर देखील लवकरच मिळणार आहे.