बाबा तुमचे प्रयत्न फळास आले; संविधान विषयावर कविसंमेलन रंगले…
संविधानाला ७५ वर्षे झाल्याच्या निमित्ताने डॉ बाबासाहेब आंबेडकर नेशनल असोसिएशन ऑफ इंजिनीअर्स जळगांव, म फुले रा शाहू डॉ बाबासाहेब आंबेडकर साहित्य मंच जळगांव आणि समाज कल्याण विभाग जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते
कविसंमेलन चे अध्यक्ष चिखली येथील ज्येष्ठ कवी विजय कुमार कस्तुरे होते,प्रमुख अतिथी भरत शिरसाठ महासचिव बौद्ध साहित्य परिषद जळगांव, बा णाई चे इंजी आर जे सुरवाडे,मनोहर तायडे आणि सुशांत मेढे होते
या संमलनासाठी जळगांव, औरंगाबाद,बुलढाणा अश्या विविध जिल्ह्यातून कवी कवयित्री आले होते. बाबा तुझे प्रयत्न फळास आले, बाबा तुम्ही सांगितले शिका,बाबा शब्दात व्यक्त करणे अवघड, आंबेडकर समाजात जन्म घेतला,बिक रहा याहा सब कूछ,बाबासाहेबांनी संविधान दिले, बाळ भीमाचे संविधान, रक्तात भीम माझ्या, जन्म जन्म का रिश्टा,अरे वाच गड्या संविधान,धनी मला दाखवणं, गर्दीत तुम्ही सामील होता, सांग कधी कळणार बुद्ध माझ्या मनातला,प्रश्न, कहाणी दोनो की, माझ्या भीम चआ रुबाब लय भारी, माणूस, राजश्री शाहू, अशा अनेक अप्रतिम कवी सादर करण्यात आल्या.
साडेतीन तास सुरू असलेल्या कविसंमेलन चे सूत्र संचालन कवी आर डी कोळी सर यांनी तर आभाप्रदर्शन ज्योती वाघ यांनी केले.