संविधान दिनानिमित्त भव्य कविसंमेलन उत्सहात संपन्न…
बाबासाहेब आंबेडकर नॅशनल असोसिएशन ऑफ इंजिनीअर्स (बानाई), म फुले रा.शाहू डा बाबासाहेब आंबेडकर साहित्य मंच जळगांव आणि सामाजिक न्याय विभाग जळगांव जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने जळगांव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन (लायब्ररी हॉल ), महाबळ परिसर येथे दि. 24/11/2024 रोजी दु.3:00वाजता कविसंमेलन आयोजित करण्यात आले. कविसंमेलनात कवीं संविधान /संविधान विषयक जागृतीपर कविता सादर होणार आहेत . या कार्यक्रमाचे उद्घाटन मा योगेश पाटील सहा आयुक्त समाज कल्याण विभाग जळगांव यांच्या हस्ते होणार असून या वेळी मा भगवान भटकर ज्येष्ठ कवी, मा भरत शिरसाठ महासचिव बौध्द साहित्य परिषद आणि प्रद्धिध आंबेडकरी विचारवंत मा जयसिंग वाघ हे उपस्थित राहणार आहेत. प्रमुख अतिथी चा हसते सर्व सहभागी कवींना प्रमाणपत्र मिळणार आहे. चहा नाश्त्याची सोय केलेली आहे.कार्यक्रम वेळेवर सुरू होणार आहे. या कविसंमेलनात जास्तीत जास्त कवी नी हजेरी लावावी असे आवाहन आयोजकांनी केले आहे.