‘या’ दिवशी होणार राज्यसेवेची पूर्व परीक्षा…
▪️ महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे 2025 मधील विविध परीक्षांचे तात्पुरते वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून हे या अंदाजित वेळापत्रकानुसार 2025 सालची महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित पूर्व परीक्षा 28 सप्टेंबर 2025 रोजी होणार आहे. याची जाहिरात जानेवारी 2025 मध्ये येण्याची शक्यता आहे.
▪️ यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा, विद्युत अभियांत्रिकी सेवा, स्थापत्य अभियांत्रिकी सेवा, विद्युत व यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा, कृषी सेवा, सहाय्यक नियंत्रक वैधमापनशास्त्र, अन्न व औषध प्रशासकीय सेवा आणि वनसेवा यांची संयुक्त पूर्व परीक्षा 28 सप्टेंबर 2025 रोजी होणार आहे. याचा निकाल जानेवारी 2026 मध्ये लागेल.
वेळापत्रकाची लिंक 👇
https://mpsc.gov.in/tentative_schedule_for_competitive_exam/19
▪️ महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा ही 2 फेब्रुवारी 2025 रोजी होणार आहे. त्याचा निकाल 2025 च्या मे महिन्यात लागणार आहे. तसेच महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित पूर्व परीक्षा-2024 ही 1 डिसेंबर 2024 रोजी होणार आहे. तसेच महाराष्ट्र गट ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 ही 5 जानेवारी 2025 रोजी होणार आहे.
▪️ गट-क ची पूर्व परीक्षा 30 नोव्हेंबर 2025 मध्ये असेल. तर या परीक्षेचा 2026 मार्च महिन्यात निकाल लागल्यानंतर मुख्य परीक्षांच्या तारखा स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येतील. दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग या पदाची पूर्व परीक्षा 12 ऑक्टोबर 2025 रोजी होईल. तर या पूर्व परीक्षेचा निकाल जानेवारी 2026 मध्ये लागेल.