UPI द्वारे चुकून दुसऱ्याच्या मोबाइलवर पैसे पाठवल्यास परत पैसे कसे मिळवायचे ; जाणून घ्या सविस्तर माहिती
यूपीआयद्वारे पैसे पाठविताना अनेकदा नजरचुकीने चुकीचा मोबाईल क्रमांक दाबला जातो. त्यामुळे चुकीच्या व्यक्तीला पैसे हस्तांतरित होतात. अशावेळी आपल्याला पैसे परत मिळू शकतात का? हा प्रश्न पडणे साहजिकच आहे.
आपण खबरदारी बाळगताना नंबर तपासूनच घेतो पण काहीवेळा एखाद्या व्यक्तीचा मोबाईल नंबर बदललेला असतो आणि इतर कुणाच्या अकाउंटशी लिंक झालेला असतो. तुम्ही याआधी याच नंबरवर व्यवहार केला असल्यास तुम्ही यावर पुन्हा पैसे पाठवत, पण यावेळेस ज्याचा मूळ क्रमांक होता त्याऐवजी ज्याच्या अकाउंटशी नंबर लिंक झालेला असतो त्याला पैसे जातात. आता अशा परिस्थितीत आपले पैसे कसे परत मिळवायचे हे आपण आज पाहणार आहोत.
समोरील व्यक्तीने नकार दिल्यास :- त्यात मुख्य अडचण अशी असते की, तुम्ही त्या व्यक्तीला ओळखत नसता. अशावेळी तुम्ही त्या व्यक्तीस लगेच फोन करून झालेला प्रकार सांगून पैसे परत करण्याची विनंती करू शकता. त्याने पैसे परत केले नाही, तर मात्र तुम्हाला नियमांनुसार प्रक्रिया पार पाडावी लागेल,
बँकेला माहिती द्या:- तज्ज्ञांनी सांगितले की, चुकून भलत्याच व्यक्तीला पैसे पाठविले गेल्याची तकार तुमच्या बँकेकडे तातडीने करा. पैसे पाठविल्याशी संबंधित पुरावे बँक तुमच्याकडे मागेल. खात्री पटल्यानंतर तुमचे पैसे परत मिळविण्याची प्रक्रिया बँकेकडून सुरू करण्यात येईल.