Take a fresh look at your lifestyle.

लग्न झालेली मुलगी असेल तर त्या पेन्शनवर तिचा अधिकार असतो का? जाणून घ्या सविस्तर माहिती

0

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी पेन्शन ही खूप महत्त्वाची बाब असून नोकरीतुन तुम्ही निवृत्त झाल्यानंतर पेन्शनच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांना एक उतारवयामध्ये भक्कम असा आर्थिक आधार असतो व इतकेच नाही तर कुटुंबाला देखील याचा मोठा आर्थिक दृष्टिकोनातून आधार असल्याचे आपल्याला बघायला मिळते.

परंतु सरकारच्या माध्यमातून जे काही पेन्शन मिळत असते त्याबाबत देखील बरेचसे नियम आहेत. अशा प्रकारचे नियम अनेक जणांना माहिती नसल्यामुळे या पेन्शनच्या संदर्भात अनेकदा गोंधळ उडतो किंवा वाद होताना देखील पाहायला मिळतात. त्यामुळे आपल्याला पेन्शन संबंधीचे नियम आणि काही त्यामध्ये नवीन नियमांची भर पडली आहे ते सगळे नियम माहित असणे गरजेचे आहे.

उदाहरणच घ्यायचे झाले तर आता जो काही सरकारचा नवा फॅमिली पेन्शन संबंधी नियम आहे त्यामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांच्या मुलींना देखील पेन्शनचा लाभ घेता येणार आहे व यासोबतच पेन्शनर व्यक्तीचा जर मृत्यू झाला तर कौटुंबिक पेन्शनचे पात्रता देखील आता ठरवण्यात येणार आहे.

तसे पाहायला गेले तर हे सर्व नियम 2021 या वर्षापासून सुरू करण्यात आलेली आहेत. या नियमांमध्ये कुटुंबातील सावत्र आणि दत्तक मुलींसह अविवाहित, विवाहित तसेच अपंग मुलींचा देखील समावेश करण्यात आला आहे.

मला काम पाहिजे आहे. कोणाकडे असल्यास संपर्क करावा. 🙏

वरती माझा रिझुम जोडत आहे.👆

मो. नं : 7798306516

 

आई-वडिलांच्या पेन्शनच्या बाबतीत मुलींच्या बद्दल काय आहेत नियम : जर आपण पेन्शन संदर्भात असलेले हे नवीन नियम बघितले तर यामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना त्यांच्या पात्र कुटुंबातील सदस्यांच्या यादीतून मुलीचे नाव वगळता येणार नाही.

या नवीन नियमानुसार बघितले तर मुलींना देखील आता पेन्शन बाबत असलेले सर्व लाभ मिळणार आहेत. नियमानुसार मुलगी ही कुटुंबातील सदस्य असते व त्यामुळे कुटुंबाच्या तपशिलात मुलीचे नाव समाविष्ट करण्यात येईल. पेन्शनसंबंधी असलेल्या या नवीन नियमानुसार बघितले तर मुलगी ही अपंग असताना किंवा लग्न होईपर्यंत किंवा तिला जॉब लागेपर्यंत ती पेन्शन साठी पात्र असेल.

या नवीन नियमानुसार पंचवीस वर्षावरील अविवाहित, विधवा आणि घटस्फोट झालेल्या मुली कौटुंबिक पेन्शनचा लाभ घेऊ शकणार आहेत. तसेच कुटुंबातील सर्व मुलांचे वय 25 असेल आणि ते काम करत असतील तर घरातील अपंग मुलाचा पहिला हक्क आई-वडिलांचे पेन्शनवर असणार आहे.