Take a fresh look at your lifestyle.

लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांच्या कुटुंबाला वार्षिक ३ गॅस सिलेंडर मोफत…

0

राज्यातील प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना तसेच मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांच्या कुटुंबाला वार्षिक ३ गॅस सिलेंडरचे पुनर्भरण (Refill) मोफत उपलब्ध करून देण्याचा निर्णय वाचा क्रमांक १ येथील शासन निर्णयान्वये घेण्यात आला आहे.

सदर योजना “मुख्यमंत्री अन्नपुर्णा योजना” या नावाने राबविण्यात येत आहे. दि.३०.०७.२०२४ रोजीच्या शासन निर्णयान्वये मुख्यमंत्री अन्नपुर्णा योजनेची कार्यपध्दती विहित केली आहे. तसेच वाचा क्र.२ शासन निर्णय शुध्दीपत्रक दि.०४.०९.२०२४ अन्वये काही तरतुदी सुधारित करण्यात आल्या आहेत.

तथापि, मा. मंत्रीमंडळाच्या दि.२३.०९.२०२४ रोजीच्या बैठकीत पुढील प्रमाणे निर्देश देण्यात आलेले आहेत. “सद्यस्थितीत काही प्रकरणी घरगुती गॅस सिलेंडर जोडणी ही कुटुंबातील पुरुषांच्या नावावर असल्यामुळे अन्नपूर्णा योजनेतील महिलांना थेट अनुदान मिळण्यास अडचण निर्माण होत आहे, यास्तव घरगुती गॅस सिलेंडर जोडणी ही घरातील महिलांच्या नावावर करण्याबाबत आवश्यक कार्यवाही करावी, जेणेकरुन अन्नपूर्णा योजनेंतर्गत उपलब्ध होणारे अनुदान थेट महिलांना प्राप्त होईल.” सबब, त्यानुषंगाने मुळ शासन निर्णयात काही सुधारणा करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन शुध्दीपत्रक:-

मुख्यमंत्री अन्नपुर्णा योजनेसंदर्भातील समक्रमांक दि ३०.०७.२०२४ रोजीच्या शासन निर्णयातील मुद्दा क्र. २ (ब) (xiii) खालीलप्रमाणे आहे.:-

“दि.०१. जुलै, २०२४ रोजी पात्र होणाऱ्या लाभार्थ्यांनाच सदर योजनेचा लाभ देण्यात येईल.” त्याऐवजी खालील प्रमाणे वाचण्यात यावा:- “मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेंतर्गत महिला व बाल विकास विभागाकडून पात्र ठरविण्यात आलेल्या लाभार्थ्यांपैकी, दि. ०१ जुलै, २०२४ पर्यंत शिधापत्रिकानुसार कुटुंबातील इतर सदस्याच्या नावे गॅसजोडणी असलेल्या महिला लाभार्थ्यांनी स्वत:च्या नावे गॅसजोडणी हस्तांतर केल्यावर त्या महिला मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेस पात्र ठरतील.” मूळ शासन निर्णय दि.३०.०७.२०२४ मधील अन्य अटी व शर्ती व शासन शुध्दीपत्रक दि.०४.०९.२०२४ मधील सुधारित तरतुदी कायम राहतील.

सदरील शासन निर्णय मा. मंत्रीमंडळाच्या दि.२३.०९.२०२४ रोजीच्या बैठकीमधील निर्देशानुसार निर्गमित करण्यात आला आहे.