Take a fresh look at your lifestyle.

आदिवासी विभाग भरती शासन परिपत्रक जारी…

0

आदिवासी विकास विभाग, शासन निर्णय क्रमांक पदआ-३८१७/प्रक्र.१३९/का. १५ दिनांक १६ नोव्हेंबर, २०२२ अन्वये सुधारित आकृतीबंध मंजूर करण्यात आलेला असून शासन निर्णय वित्त विभाग, क्र. पदनि २०२२ /प्रक्र.२ / २०२२/ आ.पु.क. दिनांक ३१ ऑक्टोबर, २०२२ अन्वये ज्या विभागाचा सुधारित आकृतीबंध मंजूर झालेला आहे त्या विभाग/कार्यालयातील सरळसेवेच्या कोटयातील रिक्त पदे १०० टक्के भरण्यास दिलेल्या मान्यतेनुसार आयुक्त, आदिवासी विकास विभाग,

महाराष्ट्र राज्य नाशिक हे त्यांचे अंतर्गत अपर आयुक्त, कार्यालय नाशिक / ठाणे/ अमरावती / नागपुर यांचे अधिनस्त आस्थापनेवरील वर्ग-३ संवर्गातील वरिष्ठ आदिवासी विकास निरिक्षक / संशोधन सहाय्यक / उपलेखापाल-मुख्यलिपिक-सांख्यिकी सहाय्यक (वरिष्ठ) / आदिवासी विकास निरिक्षक (नॉनपेसा) / वरिष्ठ लिपिक – सांख्यिकी सहाय्यक / कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी/ लघुटंकलेखक/ गृहपाल-स्त्री / गृहपाल पुरुष / अधिक्षक स्त्री / अधिक्षक पुरुष / ग्रंथपाल/सहाय्यक ग्रंथपाल/ प्रयोगशाळा सहाय्यक/ कॉमेरामन-कम-प्रोजेक्टर ऑपरेटर तसेच आयुक्त कार्यालयाचे स्तरावरील उच्चश्रेणी लघुलेखक व निम्नश्रेणी लघुलेखक इ. भुतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील गट-क संवर्गातील निम्न नमूद सरळसेवेची पदे भरण्यासाठी खाली नमूद केलेल्या रिक्त पदांकरिता पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

ऑनलाईन पध्दतीने अर्ज भरावयाची सुविधा https://tribal.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर दिनांक १२.१०.२०२४ पासुन उपलब्ध होणाऱ्या लिंक वर उपलब्ध करुन दिलेली आहे.