Take a fresh look at your lifestyle.

मेंढपाळ लाभार्थीच्या थेट खात्यात रक्कम जमा होणार; शासन निर्णय जारी

0

शासन निर्णयान्वये धनगर व तत्सम समाजास आर्थिक स्थैर्य प्राप्त करुन देण्यासाठी व ९ मेंढी पालनास प्रोत्साहन देण्यासाठी अनुदान तत्वावर “राजे यशवंतराव होळकर महामेष योजना” ही योजना सुरु करण्यात आली आहे. सदर योजना राबवितांना आलेला अनुभव व सदर योजनेसाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळ लिमिटेड, पुणे यांच्याकडे प्रतिक्षाधिन असलेल्या २५६९५ अर्जाची संख्या व उपलब्ध निधी विचारात घेऊन “राजे यशवंतराव होळकर महामेष योजना पुढे चालू ठेवण्याची आवश्यकता विचारात घेऊन पुढील निर्णयास मान्यता देण्यात येत आहे.

(१) धनगर व तत्सम समाजास सामाजिक व आर्थिक स्थैर्य प्राप्त करुन देण्यासाठी शासन निर्णय अन्वये लागू करण्यात आलेली “राजे यशवंतराव होळकर महामेष योजना यापूढे चालू ठेवण्यात येत आहे.

(२) “राजे यशवंतराव होळकर महामेष योजना” या योजनेसाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळाकडे अखर्चित असलेला रु. २९.५५ कोटी इतका निधी चालु वित्तीय वर्षात खर्च करण्यात यावा. तसेच पुढील वर्षापासुन उपलब्ध अर्थसंकल्पीय तरतुदीच्या मर्यादित लाभार्थ्यांना लाभ देण्यात येईल.

(३) या योजनेतील लाभार्थ्यांचा प्रतिसाद विचारात घेऊन लाभार्थी उद्दिष्टे तसेच आर्थिक उद्दिष्टे यामध्ये अंतर्गत बदल करण्याचे अधिकार प्रशासकीय विभागास प्रदान करण्यात आले आहे.

मेंढपाळ लाभार्थीच्या रक्कम थेट खात्यात जमा :- व्यवस्थापकीय संचालक, पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळ लिमिटेड, पुणे यांना वरील कागदपत्रे सादर केल्यानंतर ७५ टक्के अनुदानाची रक्कम ७ दिवसात थेट लाभ हस्तांतरण प्रक्रियेच्या (DBT) माध्यमातून लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात येईल. सदर योजनेंतर्गत लाभार्थ्यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळ लिमिटेड, पुणे यांच्या प्रक्षेत्रावरुन देण्यात येणा-या चारा बियाणे व बहुवार्षिक गवत प्रजातीचे ठोंबे / बियाणे यासाठीचे अनुदान वगळता उर्वरित सर्व बाबींचे लाभ पूर्वीप्रमाणेच थेट लाभ हस्तांतरण प्रक्रियेच्या (DBT) माध्यमातून लाभार्थ्यांना देण्यात येईल. राजे यशवंतराव होळकर महामेष योजना या योजनेच्या इतर अटी, शर्ती व कार्यपध्दती शासन निर्णय क्र. पविआ २०१७/प्र.क्र.६५/पदु-३, दिनांक २.६.२०१७ प्रमाणेच राहतील.