Take a fresh look at your lifestyle.

महामंडळाच्या योजनांचा लाभ घेऊया… सर्वांगीण उन्नती साधूया

0

परदेशांतर्गत शिक्षणासाठी २५ युवक-युवतींना उच्च शिक्षणाकरिता कर्जाचा लाभ देण्यात येणार आहे.

या महामंडळामार्फत वेबसाईट प्रणाली विकसित करण्यात आली आहे. या योजनांची माहिती https://www.slasdc.org या वेबसाईटवर आहे.

राज्यातील मातंग समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, सांस्कृतिक व राजकीय असा सर्वांगीण विकास करण्यासाठी शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे या संस्थेच्या धर्तीवर मातंग समाजासाठी अण्णा भाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था( आर्टी) स्थापना करण्यात आली आहे.

आर्टी संस्थेच्या माध्यमातून शिक्षण,उच्चशिक्षण, प्रशिक्षण, संशोधन, कौशल्य विकास, रोजगार व रोजगार प्रशिक्षण, स्टार्टअप, रोजगार निर्मिती, प्रचार, प्रसिद्धी, प्रसार, सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक व सांस्कृतिक विकास करण्यासाठी व त्यांच्याशी निगडित विविध योजना राबविण्यात येणार आहे तसेच परंपरागत व्यवसायांना चालना देणे आर्थिक मदत करणे हे देखील उद्दिष्टे निश्चित करण्यात आले आहेत.