Take a fresh look at your lifestyle.

भारत सरकारची महाविद्यालयीन व विद्यापीठीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता सेंट्रल सेक्टर शिष्यवृत्ती योजना सन २०२४-२५

0

उच्च माध्यमिक (इयत्ता १२ वी) प्रमाणपत्र परीक्षेमध्ये कला, वाणिज्य, विज्ञान व व्यावसायिक (Vocational) या विद्याशाखांमधील उच्चतम गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांना पुढील पदवी व पदव्युत्तर शिक्षणासाठी भारत सरकारची सेंट्रल सेक्टर शिष्यवृत्ती योजना, उच्च शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचेतर्फे राबविण्यात येते. सदर शिष्यवृत्तीसाठी केंद्रशासनाकडून महाराष्ट्र राज्यासाठी ७४१७ इतके नवीन मंजुरीसाठी संच निर्धारित केलेले आहेत. या योजनेचा लाभ राज्यातील सर्व पात्र विद्यार्थ्यांना घेता यावा यासाठी नवीन मंजूरीचे आणि नूतनीकरणाचे (Renewal) अर्ज ऑनलाइन (Online) पद्धतीने नॅशनल स्कालरशिप पोर्टलवरून (एन.एस.पी.) मागविण्यात येत आहेत. ऑफलाइन (Offline) पद्धतीने भरलेले अर्ज कोणत्याही परिस्थितीत स्वीकारले जाणार नाहीत. नवीन मंजुरीसाठी केंद्रशासनाकडून गुणवत्ता यादी (Merit List) तयार करण्यात येते. विद्यार्थ्यांना मंजूर झालेल्या शिष्यवृत्तीची रक्कम केंद्रशासनामार्फत थेट विद्यार्थ्यांच्या खात्यात (Under DBT Mode) जमा करण्यात येते. नवीन मंजुरीसाठी (Fresh) सदर योजनेसाठी SSC, CBSE व ICSE बोर्डचे टॉप २०th Percentile यादीतील सर्व विद्यार्थी या योजनेचा अर्ज करण्यास पात्र असतील.

सदर शिष्यवृत्तीसाठी उच्च शिक्षण कार्यालयामार्फत केवळ माध्यमिक व उच्च सरकारने घोषित केलेले वेळापत्रक :- माध्यमिक शिक्षण मंडळाची बोर्डची (HSC) विद्यार्थ्यांची यादी संचालनालयाच्या www.dhepune.gov.in या संकेतस्थळावर लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल. भारत सरकारची महाविद्यालयीन व विद्यापीठीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता सेंट्रल सेक्टर शिष्यवृत्ती योजना सन २०२४-२५ करिता नवीन शिष्यवृत्ती (Fresh) व नूतनीकरण (Renewal) अर्ज सादर करण्यासाठी भारत

विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज भरण्याचा अंतिम दिनांक ३१.१०.२०२४

महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांचे ऑनलाइन अर्ज फॉरवर्ड करण्यासाठी विद्यार्थ्यांनी ऑनलाइन भरलेल्या अर्जासोबत दिलेल्या कागदपत्रांची तपासणी करून त्या अर्जावर विनाविलंब योग्य ती कार्यवाही करून पात्र अर्ज पुढील टप्प्यावर तात्काळ फॉरवर्ड करावेत.

विद्यार्थ्यांनी व महाविद्यालयांनी अधिक माहितीसाठी www.scholarships.gov.in हे संकेतस्थळ अवलोकन करावे. तसेच संकेतस्थळावर दिसणाऱ्या Helpline No. 0120-6619540 या क्रमांकावर किंवा helpdesk@nsp.gov.in या ई-मेल वरून संपर्क साधावा. तसेच उच्च शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे-१ येथील दूरध्वनी क्रमांक 020-29707098/26126939 वर अधिक माहितीसाठी संपर्क साधावा, केंद्रशासनाकडून वेळोवेळी प्राप्त होणाऱ्या नवीन सूचनांसाठी या संचालनालयाच्या www.dhepune.gov.in व www.scholarships.gov.in या संकेतस्थळाचे अवलोकन करावे. (सदर शिष्यवृत्तीबाबतचे सविस्तर परिपत्रक संचालनालयाच्या www.dhepune.gov.in या संकेतस्थळावर लवकरच उपलब्ध करून देण्यात येईल.)

(डॉ. शैलेंद्र देवळाणकर)

शिक्षण संचालक, उच्च शिक्षण महाराष्ट्र राज्य, पुणे-०१