Take a fresh look at your lifestyle.

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतंर्गत विद्यार्थ्यांना मिळणार १० हजार विद्यावेतन…

0

राज्यातील युवकांना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देवून त्यांची नोकरी मिळण्याची क्षमता वाढविण्यासाठी “मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना” सन २०२४-२५ या आर्थिक वर्षापासून सुरु करण्यास मान्यता देण्यात येत आहे.

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचे स्वरूप :- महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि मुख्यमंत्री जन-कल्याण कक्ष यांच्यामार्फत संयुक्तपणे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना राबवली जाणार आहे. या उपक्रमांर्तगत तयार केलेल्या संकेतस्थळाच्या माध्यमातून रोजगार

इच्छुक उमेदवार आणि रोजगार उपलब्ध करून देणारे उद्योजक जोडले जातील. रोजगार इच्छुक उमेदवारांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव प्रशिक्षणातून मिळून त्यांची क्षमतावाढ होईल तसेच उद्योजकांना त्यांच्या उद्योगासाठी आवश्यक असणारे मनुष्यबळ कार्य प्रशिक्षण योजनेद्वारे उपलब्ध करून देण्यात येईल. रोजगार इच्छुक उमेदवार आणि प्रशिक्षण देऊ इच्छिणारे उद्योजक विभागाचे संकेतस्थळावर सुलभतेने नोंदणी करतील.

शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत “मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना” अंमलबजावणी करणे करीता आवश्यक निधी सन २०२४-२५ या आर्थिक वर्षात उपलब्ध करून देण्यास मान्यता देण्यात येत आहे. तसेच योजनेच्या अंमलबजावणीसाठी लागणारा प्रशासकीय खर्च, प्रचार व प्रसिध्दी इत्यादीसाठी एकूण खर्चाच्या ३ % निधी उपलब्ध करुन देण्यास मान्यता देण्यात येत आहे.

सदर शासन निर्णय मा.मंत्रीमंडळाच्या दि. ०८ जुलै, २०२४ रोजी पार पडलेल्या बैठकीतील निर्णयानुसार निर्गमित करण्यात येत आहे. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला आहे.