Take a fresh look at your lifestyle.

स्पर्धा परीक्षा करणाऱ्यांसाठी महत्वाचे; राज्यसेवा परीक्षा पुढे ढकलली; यादिवशी होणार परीक्षा…

0

राज्यसेवा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी आहे. 6 जून रोजी होणारी राज्यसेवा परीक्षा आता 21 जुलै रोजी घेण्यात येणार आहे.

ज्या आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांच्या कुणबी अशा नोंदी सापडल्या आहेत त्यांना ओबीसी प्रवर्गातून अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे परीक्षेच्या तारखेमध्येही बदल करण्यात आला आहे.

या संबंधित निवेदन महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आलं आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून वर्ग 1 आणि वर्ग 2 प्रवर्गातील एकूण 524 पदांसाठी ही परीक्षा घेण्यात येणार आहे.