Take a fresh look at your lifestyle.

एस.टी.ने प्रवास करताना अडचणी आल्यास ‘या’ हेल्पलाईन नंबरवर करा तक्रार

0

एसटीच्या तिकीट आरक्षणासाठी असलेल्या ऑनलाईन प्रणालीचे आधुनिकीकरण झाले आहे. त्यामुळे एसटीच्या तिकीटांचे आरक्षण आता झटपट होत आहे. पूर्वीप्रमाणे एसटीचे तिकीट ऑनलाईन बुक करताना अडचणी येत नाहीत.

एसटी प्रवाशांनी तिकीट बुक करण्यासाठी npublic.msrtcors.com या अधिकृत संकेतस्थळाबरोबरच MSRTC Bus Reservation मोबाईल ॲपचा वापर करावा असे आवाहन एसटी महामंडळाने केले आहे. ऑनलाईन आरक्षण करताना प्रवाशांना तांत्रिक अडचण आल्यास 7738087103 या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा.

हा नंबर प्रवाशांना तांत्रिक अडचणी सोडविण्यासाठी 24 तास सुरु असणार आहे. तसेच ऑनलाईन आरक्षण करताना पैसे भरुन देखील तिकीटे बुक न होणे या तक्रारींसाठी 0120-4456456 या दुरध्वनी क्रमांकावर संपर्क करावा असे आवाहन एसटी महामंडळाने केले आहे.