गावात राहून ‘हा’ व्यवसाय करण्यासाठी शासन देतय अनुदान
सरकार तरुणांच्या व्यवसायाला प्रोत्साहन देण्यासाठी वारंवार प्रयत्न करत असतात. दरम्यान तुम्हाला जर व्यवसायात उतरायचे असेल तर नेमका कोणता व्यवसाय सुरु करावा? असा प्रश्न तुमच्या मनात असतो.
तर गावात राहून तुम्ही माती परीक्षण केंद्र उघडू शकता. या व्यवसायासाठी सरकार 4.4 लाख रुपयांचे अनुदान देते. गावात बसून तुम्ही माती परिक्षणाचा व्यवसाय सहज करु शकता. यासाठी तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही.
ज्या शेतकऱ्याच्या शेतातील मातीचे परिक्षण करायचे आहे, तो शेतकरी तुम्हाला माती आणून देईल. त्यानंतर तुम्हाला परिक्षण केंद्रावर मातीची तपासणी करावी लागेल. यासाठी संबंधीत शेतकऱ्याला नमुन्यासाठी 300 रुपये द्यावे लागतील. या माध्यमातून तुम्ही महिन्याला 15 ते 20 हजार रुपये मिळवू शकता.