विद्यार्थ्यांकरिता, पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजना…
पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजनेच्या धर्तीवर, वसतिगृह योजनेपासून वंचित असलेल्या विदयार्थ्यांकरिता पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजना राबविण्यास दि. ०६.०९.२०१९ च्या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आलेली आहे.
मा. मंत्रीमंडळाच्या दि. १९.१०.२०२३ रोजी झालेल्या बैठकीमध्ये घेण्यात आलेल्या निर्णयाप्रमाणे, वसतिगृहाच्या लाभापासून वंचित असलेल्या विदयार्थ्यांकरिता लागू असलेल्या विविध प्रकारच्या योजनांमध्ये तसेच यापुढे प्रस्तावित करण्यात येणाऱ्या योजनांमध्ये एकसमानता रहावी यासाठी सर्वंकष धोरण निश्चित करण्याबाबतचा निर्णय दि.३०.१०.२०२३ रोजीच्या शासन निर्णयान्वये घेण्यात आलेला आहे.
पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयंम योजना या योजनेकरिता निश्चित केलेल्या निकषामध्ये एकसमानता यावी याकरिता सुधारित प्रस्ताव मा.अ.मु.स (वित्त) यांचे अध्यक्षतेखाली दि. ०५.०४.२०२४ रोजी आयोजित बैठकीमध्ये सादर करण्यात आला. सदर बैठकीमध्ये विद्यार्थ्यांकरीता स्वयंम योजनेच्या अनुषंगाने प्रस्तावित केलेले निकष हे विभागाने अर्थसंकल्पीय तरतुद विचारात घेऊन सक्षम प्राधिकाऱ्याच्या मान्यतेने व सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने निर्गमित केलेल्या दि. ३०.१०.२०२३ रोजीच्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार विभागाच्या स्तरावर अंतिम करावेत असा निर्णय घेण्यात आला आहे.