Take a fresh look at your lifestyle.

गोदाम बांधकाम अनुदान योजनेसाठी अर्ज सुरु -२०२४

0

अन्न आणि पोषण सुरक्षा कडधान्य सन 2024-25 अंतर्गत, स्थानिक पुढाकाराच्या बाबींतंर्गत, शेतकरी उत्पादक संघ, कंपनी (FPO/FPC) करिता गोदाम बांधकाम (250 मे.टन क्षमता) या बाबीचा भौतिक संख्या व आर्थिक रक्कम लक्षांक राज्यातील जिल्ह्यांस प्राप्त झाला आहे.

जिल्ह्यातील इच्छुक शेतकरी उत्पादक संघ, कंपनी (FPO/FPC) यांनी आपले अर्ज 31 जुलै 2024 पूर्वी संबंधित तालुका कृषि अधिकारी यांच्यामार्फत सादर करावेत, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांनी केले आहे.

अनुदान :- लाभार्थी निवड ऑगस्ट 2024 मध्ये होईल. लक्षांकाच्या तुलनेत अर्ज जास्त आल्यास सोडत पध्दतीने निवड करण्यात येईल. अन्नधान्य पिके, कडधान्य पिके घेतली जातात तथापि गोदामाची व्यवस्था नाही अशा ठिकाणी गोदाम बांधकामासाठी प्रत्यक्ष खर्चाच्या 50 टक्के किंवा रक्कम 12.50 लाख रुपये यापैकी जे कमी असेल त्याप्रमाणे अनुदान अनुज्ञेय राहील.

पात्रता :- इच्छूक अर्जदार शेतकरी उत्पादक संघ किंवा कंपनी यांनी केंद्र शासनाच्या ग्रामीण भंडारण योजना किंवा नाबार्डच्या मार्गदर्शक सूचनांनुसार बँकेकडे प्रकल्प सादर करावा. बँकेने कर्ज मंजूर केल्यानंतर अर्जदार पात्र ठरेल.

अर्ज करण्याचे ठिकाण :- गोदाम बांधकाम अनुदान योजनेसाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालय येथे अर्ज करावा, व इतर तांत्रिक माहितीसाठी देखील आपण आपल्या तालुक्यातील कृषि विभागाशी संपर्क साधावा, असे कृषी विभागामार्फत कळविण्यात आले आहे.