Take a fresh look at your lifestyle.

महाराजा सयाजीराव गायकवाड -सारथी शिष्यवृती…

0

महाराष्ट्र राज्यातील अधिवासी असलेल्या “मराठा, कुणबी, मराठा-कुणबी व कुणबी-मराठा” जातीतील गुणवंत मुला-मुलींना “महाराजा सयाजीराव गायकवाड-सारथी गुणवंत मुला-मुलींना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना अंतर्गत सन २०२४-२५” करिता पदव्युत्तर पदवी, पदव्युत्तर पदविका आणि संशोधनात्मक अभ्यासक्रमाचे (पीएच.डी.) विशेष अध्ययन करण्यासाठी विद्यार्थ्यांकडून शिष्यवृतीसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.

महाराष्ट्र राज्यातील मराठा, कुणबी, मराठा-कुणबी व कुणबी-मराठा जातीतील ज्या विद्यार्थ्यांनी सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात पदव्युत्तर पदवी, पदव्युत्तर पदविका आणि संशोधनात्मक अभ्यासक्रमाचे (पीएच.डी) अभ्यासक्रमाकरिता QS (Quacquareli Symonds) World Ranking २०० च्या आत रॅन्कींग असलेल्या परदेशातील शैक्षणिक संस्थेमध्ये प्रवेश घेतला असेल, अशा विद्यार्थ्यांकरिता नियोजन विभाग, शासन निर्णय क्रमांक सारथी २०२२/प्र.क्र.२८९/का.१४२५-अ दि. २० जुलै २०२३ नुसार सदर शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येत आहे.

ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक 

https://sarthifs.sarthi-maharashtragov.in/