सांस्कृतिक मंत्रालयाची युवा कलाकार शिष्यवृत्ती योजना…
भारतीय शास्त्रीय संगीत, शास्त्रीय नृत्य, रंगमंच, दृष्यकला, लोककला, पारंपरिक आणि देशी कला, सुगम शास्त्रीय संगीत आणि मूक अभिनय या कलांमधील प्रगत प्रशिक्षणासाठी भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयामार्फत, यंग आर्टिस्ट स्कॉलरशीप ही योजना राबवली जाते. या योजनेंतर्गत ४०० कलावंतांची शिष्यवृत्तीसाठी निवड केली जाते.
पात्रता :- संबंधित कलावंताने आपल्या कला क्षेत्रातील गुरुंकडे किवा संस्थेकडे किमान पाच वर्षांचे प्रशिक्षण घेतलेले असावे, शिष्यवृत्तीसाठी अर्ज करताना संबंधित गुरु किंवा संस्थेचे प्रमाणपत्र सोबत जोडावे लागेल. ही शिष्यवृत्ती प्रगत प्रशिक्षणासाठी असल्याने संबंधित कलावंताने आपल्या कलेत किमान प्रभुत्व मिळवलेले असावे. ही शिष्यवृत्ती नवशिक्या कलाकारांसाठी नाही. खडतर प्रगत प्रशिक्षणासाठी आपण तयार असल्याचा पुरावा संबंधित कलाकारास द्यावा लागेल. संबंधित कलाकाराचे वय एक एप्रिल रोजी १८ वर्ष पिक्षा कमी आणि २५ वर्षापेक्षा अधिक नसावे.
या शिष्यवृत्तीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांना तज्ञांपुढे आपली कला सादर करावी लागेल किंवा मुलाखत द्यावी लागेल. मुलाखत किंवा कला सादरीकरणाची वेळ तारीख आणि ठिकाण उमेदवारांना ईमेलद्वारे कळवले जाते. उमेदवाराची निवड पूर्णपणे गुणवत्तेवर केली जाते. निवड यादी संस्थेच्या संकेतस्थळावर घोषित केली जाते, निवड झालेल्या उमेदवारांना प्रत्यक्ष कळवलेही जाते.
संपर्क- सेन्टर फॉर कल्चरल रिसर्वेस ऍण्ड ट्रेनिंग, १५ ए. सेक्टर ७, व्दारका, नवी दिल्ली-११००७५, दूरध्वनी-०११-२५०७४२५६,
संकेतस्थळ– https://indiaculture.gov.