Take a fresh look at your lifestyle.

‘या’ विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या निवासी शाळांमध्ये शिक्षण देणे या योजनेंतर्गत शासन निर्णय जारी…

0

“भटक्या जमाती-क प्रवर्गातील धनगर समाजातील विद्यार्थ्यांना शहरांतील इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळांमध्ये शिक्षण देणे’ या योजनेंतर्गत संदर्भाधिन दि. ४ /९/२०१९ च्या शासन निर्णयामधील परिच्छेद क्र. ७ (अ) अनिवार्य निकष मधील क्र. (१) शाळाविषयक निकषामधील क्र. (३) मध्ये ‘नामांकित निवासी इंग्रजी माध्यमाच्या शाळेमधून इयत्ता दहावीच्या कमीत कमी तीन बॅच उत्तीर्ण झालेल्या असाव्यात’ असा निकष निश्चित करण्यात आला आहे. त्यामध्ये सुधारणा करुन ‘नामांकित निवासी इंग्रजी माध्यमाच्या शाळेमधून इयत्ता दहावीच्या कमीत कमी तीन बॅच उत्तीर्ण झालेल्या असाव्यात अथवा नामांकित निवासी इंग्रजी माध्यमाची शाळा सी.बी.एस.सी मान्यताप्राप्त असावी’ अशी सुधारणा करण्यास शासनाची मान्यता देण्यात आली आहे.

तसेच सदरहू योजनेंतर्गत संदर्भाधिन शासन परिपत्रक दि. १२/१/२०२२ अन्वये भटक्या जमाती-क प्रवर्गातील धनगर समाजातील विद्यार्थ्यांना नामांकित निवासी इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये इयत्ता १ ली ते ५ वी च्या विद्यार्थ्यांना सर्व टप्प्यावर प्रवेश देण्याची तरतुद करण्यात आली असुन त्यामध्ये सुधारणा करुन इयत्ता १ ली ते ८ वी च्या विद्यार्थ्यांना सर्व टप्प्यावर प्रवेश देण्यास खालील अटींच्या अधिन राहून शासनाची मान्यता देण्यात आली आहे.

(१) ‘भटक्या जमाती – क प्रवर्गातील धनगर समाजातील विद्यार्थ्यांना शहरांतील इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळांमध्ये शिक्षण देणे’ या योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना प्रवेश देताना प्राधान्याने इयत्ता १ ली ते ५ वी च्या वर्गामध्ये प्रवेश देण्यात यावा.

(२) सदर योजनेंतर्गत इयत्ता १ ली ते ५ वी च्या वर्गामध्ये विद्यार्थी उपलब्ध न झाल्यास इयत्ता ६ वी ते ८ वी च्या वर्गामध्ये प्रवेश देण्यात यावा.

(३) इयत्ता ६ वी ते ८ वी च्या वर्गामध्ये प्रवेश देण्यात येणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण हे त्या शाळेला सदर योजनेंतर्गत शासनाने मान्यता दिलेल्या धनगर समाजातील विद्यार्थ्यांच्या एकूण प्रमाणाच्या १५% पेक्षा जास्त नसावे.