Take a fresh look at your lifestyle.

ज्येष्ठ नागरिकांनी घ्या ‘या’ योजनांचा लाभ…

0

देशात गुंतवणुकीचे अनेक पर्याय आहेत पण आजही लोक FD मध्ये पैसे गुंतवतात. अशातच SBI आणि HDFC ने देशातील ज्येष्ठ नागरिकांना लक्षात घेऊन विशेष FD योजना आणल्या आहेत. या दोन्ही FD योजनांमध्ये नागरिकांना किती व्याज मिळत आहे हे जाणून घेऊयात

SBI WeCare FD योजना :- SBI ने ज्येष्ठ नागरिकांसाठी SBI WeCare FD योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत बँक ग्राहकांना 5 वर्षे ते 10 वर्षांपर्यंत FD योजना देत आहे. या योजनेअंतर्गत बँक वृद्धांना 0.50 टक्के अधिक व्याज देत आहे. या सरकारी योजनेत तुम्ही 30 सप्टेंबरपर्यंत गुंतवणूक करू शकता.

HDFC बँक सीनियर सिटीझन केअर एफडी योजना :- HDFC बँकेने 60 वर्षांवरील लोकांसाठी खास FD योजना आणली आहे. या योजनेचे नाव HDFC बँक सीनियर सिटीझन केअर एफडी योजना आहे. या योजनेअंतर्गत बँक ज्येष्ठ नागरिकांना 0.75 टक्के अतिरिक्त व्याजाचा लाभ देत आहे. बँकेने या योजनेतील गुंतवणुकीची अंतिम मुदत 11 मे 2024 पर्यंत वाढवली आहे.