Take a fresh look at your lifestyle.

वणवा लावणाऱ्यांची आणि शिकार करणाऱ्यांची माहिती कळवा अन् बक्षीस मिळवा….

0

वणवा म्हणजे जंगल, कुरणे, किंवा गवताळ प्रदेशात नैसर्गिक अथवा अनैसर्गिक कारणांमुळे लागलेली अनियंत्रित आग. वणवा एकदा का पेटला की जंगल महिनाभर जळत राहू शकतो. काही समाजकंटकांकडून लावल्या जाणाऱ्या वणव्यांमुळे नैसर्गिक साधनसंपत्तीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते, हे आटोक्यात आणण्यासाठी वन विभागाने एक योजना अमलात आणली आहे.वनसंपदेची लूट करण्यासाठी जंगलांना आग लावली जाते.

वन्य प्राण्यांची शिकार केली जाते. वन संपदा आणि वन्यजीव वाचविण्यासाठी अखेर वन विभागाला बक्षीस जाहीर करावे लागले.वणवा लावणाऱ्यांची आणि शिकार करणाऱ्यांची माहिती कळवा अन् बक्षीस मिळवा, अशी योजना वन विभागाने जाहीर केली.

जंगलात आग लावल्यास भारतीय वन अधिनियम १९२७ चे २६ (१) ब आणि क तसेच वन्यजीव (संरक्षण) अधिनियम १९७२ नुसार र दंडनीय अपराध आहे. त्यासाठी तीन वर्षांपर्यंत कारावास आणि २५ हजार रुपये दंड होऊ शकतो. तसेच वणवा आणि शिकारींबाबत १९२६ या टोल फ्री क्रमांकावर माहिती देण्याचे आवाहन वन विभागाने केले आहे.