केंद्र शासनाचा मोठा निर्णय; आता ‘या’ औषधी मिळणार किरणा दुकानात
केंद्र सरकार लवकरच मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. आता सर्दी, खोकला, ताप यासाठी वापरण्यात येणारी औषधे किराणा दुकानातही विक्रीसाठी उपलब्ध करून देण्याची तयारी सुरू आहे. यासंदर्भात केंद्र सरकार ओटीसी अर्थात ओव्हर द काउंटर औषधांसाठी धोरण आणण्याच्या तयारीत आहे. त्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली असून त्यावर विचार सुरू आहे.
ओटीसी म्हणजे ओव्हर द काउंटर म्हणजे अशी औषधे जी डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय विकली जाऊ शकतात. अहवालानुसार ग्रामीण भाग डोळ्यासमोर ठेवून सरकार हे धोरण आणण्याची तयारी करत आहे. ग्रामीण भागात डॉक्टरांची कमतरता आहे, यामुळे हा निर्णय घेण्यात येणार आहे.