Take a fresh look at your lifestyle.

शेतकरी/महिला गट यासाठी मिनी राईस मिल (गिरणी) योजना…

0

राईस मिल (गिरणी) ही अन्न प्रक्रिया सुविधा आहे जिथे तांदूळ बाजारात विकण्यासाठी तांदूळावर प्रक्रिया केली जाते. संपूर्ण उत्पादन भातशेतीतून खरेदी केले जाते, आधुनिक यंत्रसामग्री आणि धूळमुक्त वातावरणात स्वच्छतेने दळणे आणि प्रक्रिया केली जाते आणि वर्गीकरण मशीनद्वारे साफ केली जाते.

राष्ट्रिय अन्न सुरक्षा अभियान – भात या कर्यक्रमामध्ये राज्यातील 8 जिल्ह्यांचा समावेश आहे, त्यामध्ये नाशिक, पुणे, सातारा, नागपुर, भंडारा, गोंदिया, चंद्रपुर व गडचिरोली या 8 जिल्ह्या मध्ये मिनी राइस मिल ही योजना राबविण्यात येत आहे.

दुर्गम भागामध्ये भात भरडाई केंद्राची (राईस मिल) पूरेशी उपलब्धता नसल्याने शेतकरी यांना भात भर डाई साठी अडचणी निर्माण होतात. सदर समस्येवर मात करण्यासाठी ग्रामीण भागात विजेवर तसेच विजेशिवाय चालणारे मिनी राइस मिल चा या योजनेत समावेश करण्यात आला आहे.

अर्ज कोण करू शकतात:- शेतकरी/महिला गट मिनी राईस मिल योजनेसाठी अर्ज करू शकतात.

अर्ज कुठे करावा:- अधिक माहितीसाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालया मध्ये संपर्क करून तेथे अर्ज करावा.