Take a fresh look at your lifestyle.

प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम (पीएमईजीपी)

0

उद्दिष्ट

• ग्रामीण तसेच शहरी क्षेत्रांमध्ये स्वयं रोजगार उपक्रम सुरू करण्यासाठी आर्थिक सहाय्य देणे आणि शाश्वत रोजगाराची संधी तयार करणे हा या योजनेचा हेतू आहे.

• ग्रामीण आणि बेरोजगार युवक तसेच संभाव्य पारंपरिक कारागीर यांच्यासाठी शाश्वत आणि सातत्यपूर्ण रोजगार तयार करणे आणि त्याद्वारे व्यावसायिक स्थलांतर रोखणे.

मुख्य फायदे

• गैर-कृषी क्षेत्रामध्ये नवीन सूक्ष्म उद्योग स्थापन करण्यासाठी पत आधारित अनुदान कार्यक्रम.

• उत्पादन क्षेत्रामध्ये 50 लाखपर्यंतच्या प्रकल्पांसाठी आणि सेवा क्षेत्रामध्ये 20 लाखपर्यंतच्या प्रकल्पांसाठी एकूण प्रकल्प खर्चाच्या 15% ते 35% पर्यंत मार्जिन रक्कम अनुदान दिले जाईल.

एससी/एसटी/स्त्रिया/अल्पसंख्यांक/माजी सैनिक/अलिंगी/आकांक्षी जिल्हे / एनईआर (उत्तर पूर्व प्रदेश) अशांसारख्या विशेष श्रेणींमध्ये मोडणाऱ्या लाभार्थ्यांसाठी ग्रामीण क्षेत्रांमध्ये 35% आणि शहरी क्षेत्रांमध्ये 25% मार्जिन रक्कम अनुदान दिले जाते.

या योजनेसाठी हे पात्रता 

18 वर्षांवरील कोणतीही व्यक्ती अर्ज करू शकते.

विस्तृत माहिती:- सामान्य प्रवार्गा मध्ये लाभार्थ्याचे योगदान एकूण प्रकल्प खर्चाच्या 10% असेल तर विशेष प्रवार्गा तील (एससी/एसटी/ओबीसी/पीएच/स्त्रिया/माजी सैनिक/ अल्पसंख्यांक/अलिंगी/आकांक्षी जिल्हे / एनईआर) लाभार्थ्यांचे योगदान 5% असेल.

एमएसएमई योजना अधिक माहितीसाठी www.msme.gov.in वर भेट द्या