Take a fresh look at your lifestyle.

महाराष्ट्र ऑटो-रिक्षा आणि मिटर्ड टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळाची स्थापना…

0

१. महाराष्ट्र ऑटो-रिक्षा आणि मिटर्ड टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळाची स्थापना करण्यास सदर शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात येत आहे. सदर मंडळाचे मुख्यालय मुंबई येथे असेल.

२. महाराष्ट्र ऑटो-रिक्षा आणि मिटर्ड टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळाकडून केंद्रशासनामार्फत व राज्यशासनामार्फत राबविण्यात येणा-या पुढील विविध कल्याणकारी योजनांचा लाभ ऑटो-रिक्षा आणि मिटर्ड टॅक्सी चालकांना देण्यात येतील-

१. जीवन विमा व अपंगत्व विमा योजना

२. आरोग्य विषयक लाभ

३. कर्तव्यावर असताना दुखापत झाल्यास अर्थसहाय्य योजना (रु.५०,०००/- पर्यंत)

४. पाल्यांच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना

५. कामगार कौशल्य वृध्दी योजना — इ.

३. महाराष्ट्र ऑटो-रिक्षा आणि मिटर्ड टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळ स्वायत्त व स्वयंपूर्ण व्हावे यासाठी शासनाकडून एकवेळचे अनुदान रुपये ५०.०० कोटी (अक्षरी रक्कम रुपये पन्नास कोटी) उपलब्ध करून देण्यास याद्वारे मान्यता देण्यात येत आहे.

४. सदर मंडळाच्या कार्यपध्दती / कामकाजाबाबतची नियमावली स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येईल.

५. सदर शासन निर्णय मा. मंत्रिमंडळाच्या दिनांक १६.०३.२०२४ रोजी संपन्न बैठकीमध्ये दिलेल्या मान्यतेच्या अनुषंगाने निर्गमित करण्यात आला आहे.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०२४०३१६१६३२४१८०२९ असा आहे.